नजर चुकीने तणनाशक प्राशन केल्याने कासार्डे – नागसावंतवाडी येथील सुनील जयराम वंजारे यांचा मृत्यू!

नजर चुकीने तणनाशक प्राशन केल्याने कासार्डे – नागसावंतवाडी येथील सुनील जयराम वंजारे यांचा मृत्यू!

कणकवली : तालुक्यातील कासार्डे – नागसावंतवाडी येथील सुनील जयराम वंजारे ( वय – ६३ ) यांनी तणनाशक औषध प्राशन केल्याने बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खाजगी रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबतची खबर मयत यांचा मुलगा सचिन वंजारे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.

सुनील वंजारे यांनी मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नजर चुकीने तणनाशक औषध प्राशन केल्याने अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना त्यांचा मुलगा सचिन वंजारे यांनी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.