वेंगुर्ले लाईट हाऊस जवळ गरी ने मासेमारी करताना अणसूर येथील युवक समुद्रात बुडाला…

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले निमुसगा भागात लाईटहाऊस जवळ किनाऱ्यावरील खडकावर बसून अणसूर येथील युवक आज गुरुवार १६ जुलै रोजी सायंकाळी गरी ने मासेमारी करत होता. मात्र एका मोठ्या लाटेबरोबर तो समुद्राच्या पाण्यात फेकला गेला आणि बुडाला. सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेऊनही तो सापडला नसल्याने वेंगुर्ले पोलिस ठाण्यात नापता म्हणून नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. वेंगुर्ले तालुक्यातील आठ दिवसातील ही दुसरी घटना आहे.
अणसूर देऊळवाडा येथील हा युवक मित्रांसमवेत गरी ने मासेमारी करण्यासाठी वेंगुर्ले येथे आला होता. खडकावर बसून गरी ने मासेमारी करताना समुद्राच्या एका मोठ्या लाटेवर तो पाण्यात फेकला गेला. आणि काही वेळात पाण्यात दिसेनासा झाला. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात माहिती मिळतात वेंगुर्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र उशिरापर्यंत त्याचा काही पत्ता लागलेला नाही. अशी माहिती पोलिसांनी दिली. दोन दिवसांपूर्वी मोचेमाड समुद्र किनारी असाच गरीने मासेमारी करताना एक युवक बुडाला आहे. आठ दिवसातील ही दुसरी घटना आहे.