गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील खालचा वठारात विष्णू मंदिरात आषाढी एकादशी भक्तीभावे साजरी करण्यात आली.
आषाढी एकादशी निमित्त भगवान विष्णू च्या मूर्तीला सजावट करण्यात आली होती.भगवंताचे मनोहारी,विलोभनीय रुप पाहण्यासाठी अनेक भाविक मंदिरात येतात. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत एक्का असतो.ही गेली ८८ वर्षांची परंपरा आहे.
रात्री परंपरेप्रमाणे विष्णू प्रासादिक भजन मंडळाचे,भजन होणार आहे.विष्णू वाडीतील रहिवासी मोठ्या भक्तीभावाने, आषाढी एकादशीला एकत्र येत विष्णू मंदिरात भक्तीभावे पंढरपूरच्या पांडुरंगाचे स्मरण करतात.यामध्ये लहान थोर सारेच सहभागी झाल्याने,वातावरण चैतन्यपूर्ण असते.












