पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडून कु. जय राजशेखर मणचेकरचा विशेष सत्कार व अभिनंदन

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडून कु. जय राजशेखर मणचेकरचा विशेष सत्कार व अभिनंदन

देवगड तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात २२वा क्रमांक मिळवत शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्याला दिल्या शुभेच्छा

देवगड : माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून देवगड तालुक्यात प्रथम व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२वा क्रमांक मिळवत शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या कु. जय राजशेखर मणचेकर याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी अभिनंदन करून त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, सभापती गणेश राणे, संदीप साटम, बाळ खडपे,  योगेश चांदोसकर वैभव कळंगुटकर तसेच पंचायत समिती सदस्य सदा ओगले , जयचे वडील राजशेखर मणचेकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही कु. जय राजशेखर मणचेकर याचे कौतुक करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. राजशेखर मणचेकर हे देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये अधिकारी आहेत