भुजनागवाडी येथील विठ्ठल मंदिरात अखंड भजनी सप्ताहाला प्रारंभ

वेंगुर्ला | प्रतिनिधी :शहरातील भुजनागवाडी विठ्ठल मंदिरात गुरुवारपासून अखंड भजनी सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. यानिमित्त रोज संगीत व वारकरी भजने तसेच पौराणिक कथांवर देखावे साकारले जात आहे.
बुधवारी दाभोसवाडा येथून ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात दिंडी येणार आहे. तर गुरुवारी विठ्ठल रखुमाईची पालखी शहरात फिरणार आहे. यावेळी पालखीवर भाविक लाडवांचा वर्षाव करणार असून त्यानंतर सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी श्रींचे दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटोओळी – सप्ताहाच्या दुस-या दिवशी मंदिरात “ध्रुव बाळाची विष्णू भक्ती’ हा देखावा साकारण्यात आला होता.