फोंडाघाट मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात !

फोंडाघाट : जिल्ह्यामध्ये लक्षवेधी ठरणारे फोंडाघाट एस. टी. स्टँडवर माळवाडी शाळेतील शिक्षक व मुलांसह वाहतूक नियंत्रक, राठोड साहेब, पवार साहेब, आणि आप्पा सावंत-पटेल, खाचणे सर, कुमार नाडकर्णी,संजय तसेच चालक- वाहक, रिक्षा चालक, खोके धारक आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उत्साहात पारंपारिक पद्धतीने भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. राष्ट्रध्वजाला वंदन करून, राष्ट्रगीतासह “भारत माता की जय चा जयघोष” करण्यात आला.