दापोली :- ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ईगल स्केटर्स क्लब दापोलीच्या कुमार प्रद्युम्न प्रथमेश दाभोळे व कोच प्रथमेश प्रदीप दाभोळे यांनी ८० मिनिट अखंड स्केटिंग मॅरेथॉन करत फोर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड,
युनायटेड अरब इमिरातीस वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड,
युरोपियन युनियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ही तीन रेकॉर्ड यशस्वीरित्या पूर्ण केली.
८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भारतातील विविध राज्यात ५२२ स्केटिंग खेळाडूंनी एकाच वेळी सर्वत्र आपापल्या शहरांमध्ये राष्ट्रध्वज हातात घेऊन वंदे मातरम चा नारा देत ही तीन रेकॉर्ड यशस्वीरीत्या पूर्ण केली. हे रेकॉर्ड यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी प्रिती दाभोळे यांनी काम पाहिले.
ही तीन रेकॉर्ड यशस्वीरीत्या केल्याबद्दल त्यांचे सहाय्यक आयुक्त,तपासणी कोकण विभाग श्रीम.मनिषा देवगुणे मॅडम यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.













