स्वरसंगम म्युझिक आयोजित”आवाज कोकणचा” गायन स्पर्धा २०२६ मध्ये ह.भ.प परेश अरुण आंब्रे जिल्हात प्रथम

चिपळूण (प्रतिनिधी) : स्वरसंगम म्युझिक प्रस्तूत मनिष पाले आयोजित गायन स्पर्धा २०२६ “आवाज कोकणचा” ही जिल्हास्तरीय गायन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्हातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये शेल्डी (ता.खेड) गावचे सुपुत्र, गोड गळ्याचे गायक.. युट्युब फेम ह.भ.प परेश अरुण आंब्रे याचा जिल्हात प्रथम क्रमांक आला. द्वितीय- सौ . सिद्धी कालगुडे, तृतीय- सौ.रोशनी बुदर/बुटके, चतुर्थ- सौ.अक्षरा पवार, पंचम- कु .प्रतिक्षा भडवळकर यांनी यश संपादन केले. युवकांना प्रेरणा देण्यासाठी अशा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल सर्वांनी स्वरसंगम म्यूझिक आयोजकांचे आभार मानले.