पारंपरिक उपक्रमाचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीषा दळवी यांच्याकडून कौतुक
परुळे : प्रतिनिधी
शिवशाही परुळे आयोजित ‘नारळ लढविणे’ स्पर्धा उत्साही वातावरणात पार पडली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर बोलताना मनीष दळवी यांनी मंडळाच्या या पारंपरिक उपक्रमाचे कौतुक केले. “ग्रामीण भागातील युवकांनी पर्यटनावर भर देऊन उद्योजक बनावे आणि आपल्या गावाचा विकास साधावा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नारळ लढविणे स्पर्धेला पंचायत समिती सभापती शंकर घारे आणि जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या मध्ये नारळ लढवून प्रारंभ झाला.स्पर्धेचा निकाल: प्रथम क्रमांक: बबलू लांबर, द्वितीय क्रमांक: चव्हाटा कोचरा, तृतीय क्रमांक: प्रियांश तळवडेकर तर चतुर्थ क्रमांक: बबलू शिरसाट यांनी मिळविला.
या सोहळ्यास जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ, वेंगुर्ला सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, मच्छीमार नेते वसंत तांडेल, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, नगरसेवक प्रणव वायगणकर, सुधीर पालयेकर, प्रीतम सावंत, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, परुळे उपसरपंच प्राजक्ता पाटकर, चेतन सामंत, महेश सामंत, कमलेश गावडे, महादेव साफळे, साईनाथ माडये, आनंद गावडे, सीमा सावंत, सुवर्णा सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते अण्णा सावंत, सोमेश सावंत, अण्णा पाटकर, राजेश चव्हाण, भूषण पाटकर, रुपेश लांबर, संदीप लांबर, सुनाद राऊळ, राजू शिरसाट, जयवंत राऊळ, सोसायटीचे संचालक, ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सिद्धेश चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बादल चौधरी यांनी तर प्रास्ताविक व आभार समिती उपसभापती प्रसाद पाटकर यांनी मानले.













