प्रा.सुप्रिया नलावडे यांना पीएचडी ; डीप लर्निंगच्या माध्यमातून ‘सेंटिमेंट ॲनालिसिस’वर संशोधन

कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठ, येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयात ‘सेंटिमेंट ॲनालिसिस यूजिंग डीप लर्निंग’ या अत्याधुनिक विषयावर संशोधन पूर्ण करून सौ. सुप्रिया समीर नलावडे यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली.

सौ. नलावडे यांनी डीप लर्निंग, कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क (सीएनएन), नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी) आणि ऑप्टिमायझेशन टेक्निक्स यांच्या साहाय्याने सेंटिमेंट ॲनालिसिस अधिक अचूक व कार्यक्षम करण्यावर संशोधन केले.

विशेष म्हणजे, त्यांच्या अल्गो-डीअॅम या संशोधनाला २०२६ मध्ये जर्नल ऑफ सिस्टिम्स सायन्स अँड सिस्टिम्स इंजिनिअरिंग या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशन मिळाले आहे.

या संशोधनासाठी त्यांना मार्गदर्शक प्रा. डॉ. शामला आर. महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या शैक्षणिक व संशोधनात्मक यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठातील प्राध्यापक, सहकारी, कुटुंबीय आणि मित्रपरिवारातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.