खंडाळा | वार्ताहर :जांभारी गावचे व पंचक्रोशीतील लोकांचे दैवत श्रीभैरीदेव मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासून नामसप्ताहाला सुरूवात होणार आहे.रत्नागिरी, राजापूर, गुहागर व दापोली तालुक्यातील असंख्य भाविक या नामसप्ताह निमित्ताने भैरीदेवाच्या भेटीला येतात. अहोरात्र आठ दिवस चालणाऱ्या या नामसप्ताह निमित्ताने अनेक भजनी मंडळे मंदिरात येऊन भजनाचा आनंद घेतात.जांभारी गावातील एकूण आठ वाड्या भैरीदेवाच्या चरणी अहोरात्र भजनाच्या रूपाने सेवा देताना प्रत्येकाला समसमान पहारा व समसमान सेजआरती व काकड आरती मिळते.भक्तिमय वातावरणात संपूर्ण नामसप्ताह साजरा केला जातो.मंदिर सजावट करण्याची पाळी ही प्रत्येक वाडीला पाच वर्षांनी एकदा मिळते.
यावर्षी ही संधी कटनाकवाडी जांभारी यांना मिळाली असून यावर्षीच्या सजावटीची उत्सुकता पंचक्रोशीतील भाविकांची शिगेला पोहोचली आहे. यांचे कारण यापूर्वीही जेव्हा अशी संधी कटनाक यांना मिळाली तेव्हा कटनाकवाडी यांनी अयोध्यामधील नियोजित राममंदिर, थिबापँलेस,जूने भैरीदेव मंदिर,काचेच्या बाँटलचा वापर करून सुंदर अशी मंदिराची प्रतिकृती बनवून वाहवा मिळवली आहे.
आपल्या वाडीचा हा वारसा जपत कटनाकवाडी येथील तरूण मुलांनी यावर्षी वरवडे, रत्नागिरी गावातील राधाकृष्ण मंदिराची प्रतिकृती हुबेहूब साकारली असून त्याची स्थापना सोमवार दिनांक २१/०८/२०२३ रोजी भैरीदेव मंदिरात होणार असून ही प्रतिकृती पहाण्यासाठी व भैरीदेवाच्या नामसप्ताहाच्या आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी भाविकांनी आवश्य भेट द्यावी असे आवाहन श्री गजानन प्रासादिक विकास मंडळ कटनाकवाडी,जांभारी यांनी केले आहे











