मोटर सायकलस्वार अरूण घारे जागी झाले ठार
कुडाळ | प्रतिनिधी : मुंबई- गोवा महामार्गावरील पावशी येथे मिडल कट मधून मोटर सायकल दुसऱ्या घेऊन जात असताना गोव्यावरून रत्नागिरीला जाणाऱ्या कारने या मोटरसायकलला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये पावशी बोरभाटवाडी येथील मोटर सायकलस्वार ६५ वर्षीय अरुण शंकर घारे यांचे जागीच ठार झाले तर त्यांच्या समवेत असलेले सेवानिवृत्त पोलीस श्री पावसकर यांच्यावर ओरोस जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
पावशी बोरभाटवाडी येथील अरुण घारे हे आपल्या ताब्यातील मोटरसायकल घेऊन पावशी बोरभाटवाडी ते कुडाळ असे येत असताना त्यांच्या समवेत सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी श्री पावसकर हे होते. बोरभाटवाडी रस्त्यावरून महामार्गाच्या मिडल कट मधून ते कुडाळच्या दिशेने येणार होते. त्यांनी आपली मोटर सायकल मिडल कट पर्यंत घेऊन आले. दरम्याने गोव्यावरून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या कारचालक प्रणव जयंत यादव (रा. रत्नागिरी) यांनी या मोटरसायकलला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये मोटर सायकल स्वार अरुण घारे हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या समवेत असलेले सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी पावसकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. अरुण घारे हे लाईट, प्लंबिंगची अशी कामे करत असत त्यामुळे सर्वांचे ते परिचित होते. हा अपघात झाल्याचे समजतात घटनास्थळी माजी सरपंच पप्या तवटे, शिंदे गट शिवसेना तालुकाध्यक्ष बंटी तुळसकर, बंड्या खोत आधी दाखल होऊन त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.









