पाडलोस गाव व्हाटस्अॅप ग्रुपचे आयोजन
बांदा : प्रविण परब : पाडलोस गाव व्हाटस्अॅप ग्रुप आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, जानवली प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. वर्दे येथील श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ द्वितीय तर असरोंडीच्या श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ‘राग आमचे भजन तुमचे’ या धर्तीवर ही स्पर्धा होती.
पाडलोस गाव व्हाटस्अॅप ग्रुपच्या वतीने श्री रवळनाथ मंदिर सभागृहात जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शैलेश परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, पोलीस पाटील रश्मी माधव, निवृत्त शिक्षक श्री. गावडे, गोपाळ करमळकर, सोसायटी चेअरमन टी. एन. शेटकर, ग्रुपचे अध्यक्ष लिंगाजी पाडलोसकर, उपाध्यक्ष यशवंत सातार्डेकर, सचिव गंगाराम गावडे, सहसचिव बापू गावडे, खजिनदार राजाराम गावडे, सहखजिनदार रोहित गावडे उपस्थित होते. स्पर्धेत एकूण ९ संघांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ जानवली, द्वितीय श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ वर्दे, तृतीय श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ असरोंडी, उत्तेजनार्थ प्रथम श्री सिद्धेश्वर उद्दीनाथ प्रासादिक भजन मंडळ तळवडे, व्दितीय प्राथमिक शिक्षक कलामंच कुडाळ. वैयक्तिक पारितोषिके – उत्कृष्ट गायक – नरेंद्र मेस्त्री (श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, वर्दे), उत्कृष्ट हार्मोनियमवादक अजिंक्य कळंगुटकर (श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ, सातूळी), उत्कृष्ट पखवाजवादक प्रथमेश राणे (श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, वर्दे), उत्कृष्ट तबलावादक सिद्धेश वेंगुर्लेकर (प्राथमिक शिक्षक कलामंच, कुडाळ), उत्कृष्ट झांजवादक भालचंद्र आजगावकर (प्राथमिक शिक्षक कलामंच, कुडाळ), उत्कृष्ट कोरस (श्री सिद्धेश्वर उद्दीनाथ प्रासादिक भजन मंडळ तळवडे), उत्कृष्ट गजर (श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ सातूळी, बुवा अमित परब), उत्कृष्ट राग सादरीकरण (श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ जानवली, बुवा योगेश मेस्त्री).
सर्व विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण दिगंबर गाड (गोवा) व प्रशांत सरनोबत (मुंबई) यांनी केले. यावेळी पुरस्कर्ते अशोक गावडे, सौ. अर्चना गावडे, तुषार गावडे, दिलीप गावडे, अंकुश राणे, उपसरपंच राजू शेटकर, चैतन्या गावडे, राजाराम गावडे, विठू गावडे, आराध्य गावडे, लक्ष्मण गावडे, सचिन पाडलोसकर, महेश पाडलोसकर, समीर पाडलोसकर, राजा आंबेकर, विजय गावडे, विष्णू गावडे, दादा सातार्डेकर, सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, उदय धुरी, सुरेश गावडे, उल्हास परब यांच्यासह शेकडो भजनप्रेमी उपस्थित होते. राजा सामंत यांच्या बहारदार सुत्रसंचलनाने कार्यक्रमात आणखीन रंगत वाढली












