यावर्षी २२ लक्ष नफा ; सभासदांना १० टक्के लाभांश ; अध्यक्ष नितीन वाळके यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्थेचे पुढील पाच वर्षात १०० कोटींचा एकत्रित व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट आहे. ‘व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांसाठी स्थापन केलेल्या’ व्यापारी पतसंस्थेने यंदा २२ लक्ष रूपयांहुन अधिक नफा मिळवला असून आपल्या सभासदांना १० टक्के लाभांश ही देत असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्था अध्यक्ष नितीन वाळके यांनी सांगितले.
व्यापारी पतसंस्थेच्या कट्टा, मालवण येथे संपन्न झालेल्या २१ व्या वार्षिक अधिमंडळ सभेच्या अध्यक्षस्थाना वरून ते बोलत होते. या प्रसंगी सन २०२२-२३ साला साठीचे म्हणून सर्वोत्कृष्ट कर्जदार चंद्रकांत चमणकर (वेंगुर्ले), सर्वोत्कृष्ट ठेवीदार
नागेश मसुरकर (ओरोस),
सर्वोत्कृष्ट अल्प बचत प्रतिनिधी रितेश रजपूत (कणकवली) व सर्वोत्कृष्ट सेवाकर्मी पूजा कुडाळकर यांना सन्मानित करण्यात आले.
एकविसाव्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या व्यापारी पतसंस्थेने मागील सलग १८ वर्षे चोख आणि पारदर्शी व्यवहाराने ॲाडीट वर्ग ‘अ’ मिळवला आहे. आपल्या पतसंस्थेचा व्यवसाय वृद्धी दर प्रतिवर्षी १० टक्के आहे. यंदाच्या वर्षा पासून हा दर २० टक्के वर नेऊन पुढील वर्षी २५लक्ष ₹ नफा व येत्या पाच वर्षात म्हणजेच रौप्यमहोत्सवी वर्षा पर्यंत १०० कोटींचा एकत्रीत व्यवसाय करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवून संचालक मंडळ कामाला लागले आहे.
आधूनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यापाऱ्याच्या दुकाना पर्यंत व्यक्तीगत वित्तीय सेवा, व्यापार स्नेही अश्या पतपुरवठ्याच्या अभिनव व सुलभ कर्ज योजना, १० टक्के हुनही अधिक परताव्याच्या ठेव योजना आणि उच्च दर्जाची ग्राहक सेवा अश्या चतुःसुत्रीच्या प्रभावी अंमलबजावणी द्वारे हे उद्दीष्ट गाठण्यात यशस्वी होऊन सर्व व्यापारी सभासदांनी आजवर संस्थेवर दाखविलेला विश्वासास पात्र ठरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असा निर्धार व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन वाळके यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर व्यापारी पतसंस्था उपाध्यक्ष विद्याप्रसाद बांदेकर, संचालक अनिल सौदागर (वेंगुर्ले), प्रकाश वाळके (पावशी-कुडाळ), अरविंद नेवाळकर (कट्टा), सागर शिरसाट (दोडामार्ग), महेश नार्वेकर (कणकवली), ॲड. नंदन वेंगुर्लेकर (वेंगुर्ले), विनीता आंबेरकर (चौके), ॲड. प्रज्ञा खोत (कणकवली), राजू जठार (तळेरे) महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, संस्थेचे व्यवस्थापक काका सावंत व सल्लागार अमित पंडीत विराजमान होते.
संस्थेने केलेल्या प्रगती बद्दल व संचालक मंडळ करीत असलेल्या कामगिरी बद्दल सर्वच उपस्थित सदस्यांनी समाधान व्यक्त केले. या सभेस विलास कोरगांवकर, नितीन तायशेटे, राजन नाईक, प्रविण शेवडे, जयराम डिगसकर, श्रीराम शिरसाट, बंडू खोत, दिपक भोगले, अशोक गाड, संतोष कुडाळकर, दिपक बेलवलकर, प्रमोद ओरसकर, रत्नाकर कदम, योगेश कदम, संजय भोगटे, संजय लोके, सुरेंद्र नारकर, तेजस आंबेकर, निशिकांत डंबे, चेतन अंधारी, महादेव परब, रवि गवंडी, हेमंत सातार्डेकर, सिताराम कराळे, प्रसाद वराडकर, जगन्नाथ वालावलकर, अवधुत नेवाळकर व अन्य सभासद व्यापारी व सह. व्यवस्थापक प्रज्ञा सरंबळकर, प्रियांका तोटकेकर, ऋतुजा सामंत, वैशाली परब, गोपाळ नाईक, रविंद्र पावसकर आदी कर्मचारी वृंद व शशांक माने, सुयश गोसावी, राजेंद्र खोत हे व्यवसाय विस्तार प्रतिनिधी उपस्थित होते. सुत्रसंचलन, अहवाल वाचव व आभार व्यवस्थापक काका सावंत यांनी केले.












