गणेश चतुर्थी पूर्वी समस्या दूर करून सुविधा द्या ,मालवण शहर भाजप पदाधिकारी यांनी वेधले नगरपरिषद व वीज प्रशासनाचे लक्ष

गणेश चतुर्थी पूर्वी समस्या दूर करून सुविधा द्या

मालवण शहर भाजप पदाधिकारी यांनी वेधले नगरपरिषद व वीज प्रशासनाचे लक्ष

मालवण | प्रतिनिधी : गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच शहरातील वीज समस्याही दूर कराव्यात. या मागण्यांबाबत मालवण शहर भाजपच्या वतीने मालवण नगरपरिषद प्रशासन व विद्युत महामंडळ अधिकारी यांचे मालवण शहर भाजपच्या वतीने सोमवारी लक्ष वेधण्यात आले. भाजप शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, पूजा करलकर यांनी पालिका व वीज प्रशासन यांसमोर शहरातील समस्या मांडल्या.

गतवर्षी प्रशासनाच्या नियोजनात अनेक त्रुटी राहिल्या त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. तरी यावर्षी योग्य पद्धतीने नियोजन व्हावे नागरिक व भाविक याना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या सुचने नुसार महिनाभर आधी लक्ष वेधत असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी भाजप शहर प्रभारी तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगरसेविका पुजा करलकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, पूजा वेरलकर, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, महेश सारंग, मोहन वराडकर, प्रमोद करलकर, विलास मुणगेकर, नंदन देसाई, विलास मुणगेकर, बंड्या पराडकर, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिडये, दत्तात्रय केळुसकर, राजा मांजरेकर, निनाद बादेकर, महेश कांबळी, राज कांदळकर, बाबू कासवकर, कमलेश कोचरेकर यासह अन्य पदाधिकारी व पालिका प्रशासन अधिकारी उपस्थित होते.

शहर प्रवेश व अन्य मार्ग, गणेश विसर्जन मार्ग झाडी तोडणे, गणेश विसर्जन मार्ग ब्लिच करणे, लाईट व्यवस्था, आपत्कालीन पथक तैनात ठेवणे, डास प्रतिबंध व भटके कुत्रे यांवर उपाययोजना, बंद स्ट्रीट लाईट हायमस्ट टॉवर दुरुस्ती करणे, जलशुद्धीकरण, खड्डेमय रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, शहरातील वाहतूक नियोजन करणे, हातगाडी, फळगाड्या, भाजी विक्रेते यांच्या बैठक व्यवस्थे बाबत नियोजन, रिक्षा वाहतूक नियोजन, प्रशासन एकत्रित बैठक घेणे तसेच डोळ्यांची साथ लक्षात घेता उपाययोजना करणे. याबाबत मालवण पालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले.

वीज प्रश्नी वेधले लक्ष

मालवण शहरात स्ट्रीट लाईट सेवा योग्य पद्धतीने सुरू राहावी तसेच शहरातील घरगुती व व्यापारी क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत सुरू रहावा. कमी दाबाचा वीज पुरवठा समस्या दूर करावी. तक्रार घेण्यासाठी २४ तास कर्मचारी तैनात असावेत. वीज मार्गावर वाढीव वीज कर्मचारी तैनात असावेत याबाबत वीज अधिकारी यांचे लक्ष वेधण्यात आले. सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर यांनी यांनी शहर, मेढा मार्गावरील वीज समस्या बाबत।प्रामुख्याने लक्ष वेधले. तर आप्पा लुडबे यांनी वायरी मारहावरील समस्यांबाबत लक्ष वेधले.

कॉम्प्लेक्स, हॉटेल यांना स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर असावा

शहरात अनेक ठिकाणी घरगुती ग्राहकांच्या ट्रान्सफॉर्मर वरून कॉम्प्लेक्स व मोठ्या हॉटेल साठी वीज पुरवठा होतो. त्यामुळे परिसरात कमी दाबाचा वीज पुरवठा व अन्य समस्या निर्माण होतात. तरी मोठी हॉटेल व कॉम्प्लेक्स यांना स्वंतत्र ट्रान्सफॉर्मर घेण्याबाबत सूचना देण्यात याव्यात तशी कार्यवाही व्हावी. याबाबतही आचरेकर, पाटकर यांनी भूमिका मांडली.