वेंगुर्ले : प्रतिनिधी
पाल गाव तंटामुक्ती अध्यक्ष पदी श्री विलास अंनत गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच सौ कावेरी कमलेश गावडे यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.
श्री विलास गावडे हे पाल विकास सोसायटी मध्यें विद्यमान संचालक म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन गावाची ही नवीन जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ग्रामस्थांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. पाल विकास सोसायटीचे चेअरमन कमलेश गावडे यांनीही विलास गावडे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.













