चिमुकल्यांनी राधा, कृष्ण, पेंद्या वेशभूषा करून घेतला सहभाग
वेंगुर्ले : दाजी नाईक
विद्याभारती कोकण प्रांत संचालित “ज्ञानदा शिशुवाटिका. मठ यांचा दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला. चिमुकल्यांनी राधा, कृष्ण, पेंद्या वेशभूषा करून या उत्सवात सहभाग घेतला.
शिशुवाटिकेच्या संचालिका सौ. कांचन दामले यांनी या उपक्रमाचे नियोजन केले. यामध्ये भूमिक नांदोस्कर, समर्थ नांदोस्कर, अन्वी मटकर, भाव्या खानोलकर, अद्विक वराडकर, सार्थक गावडे, प्रियांश नार्वेकर, प्रज्वल नार्वेकर, समृद्धी धोंड आणि अनमोल गोगटे तसेच माजी विद्यार्थी स्वरांगी केरकर, गिरीजा गोगटे, तनवी केळुसकर, विदेश कुडाळकर, वैदेही कुडाळकर, शिव कुडाळकर, हार्दिक परब आणि सई गोगटे यांनीही सहभाग घेतला. सर्व पालकांनी उत्साहाने सहभागी होत कार्यक्रम यशस्वी केला.













