कॉलनीतील नागरिकांची सतर्कता, आणि सरपंच मेस्त्री यांची तत्परता यामुळे अजगराची रवानगी झाली अधिवासात
कणकवली : कलमठ दळवी कॉलनी येथे रात्रीच्या वेळी सहा फूट अजगर रस्त्यावर आल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली.भक्षाच्या शोधत रात्रीच्या अंधारात गवतता पळण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या या महाकाय अजाराला सर्पमित्रांच्या सहकार्याने पकडुन जंगल भागातील अधिवासात सोडण्यात आले. २२ ऑगस्ट रोजी रात्री शतपावली करताना कॉलनीतील ऋषी काळगे यांना हा अजगर दिसला. निवृत्त पोलिस अधिकारी प्रदीप सावंत यांना त्याची त्यांनी माहिती दिली.त्यानंतर संकेत सावंत,राजेंद्र माणगावकर ,नंदकुमार नाटेकर,सुनील दळवी, पत्रकार संतोष राऊळ,मिलिंद म्हापसेकर, योग्दा राऊळ, देविका राऊळ ,यांनी त्या भल्या मोठ्या अजगराला रस्त्यावरच अडवून धरले.त्यानंतर कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांना कल्पना दिली. त्यांनी लगेच सर्पमित्र यश वर्दम,रोहित जाधव यांना घेवून कॉलनीत आले आणि हा सहा फुटी अजगर जेर बंद करून नेला.त्यामुळे दळवी कॉलनी मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.










