चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग : वैभववाडी भाजपाच्या वतीने जल्लोष
वैभववाडी प्रतिनिधी
भारताच्या चांद्रयानने चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग केल्यानंतर वैभववाडी भाजपाच्या वतीने येथील संभाजी चौकात मोठा जल्लोष करण्यात आला. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे. भारताच्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडत व खाऊ वाटप करत जल्लोष केला. यावेळी वाभवे – वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्ष नेहा माईंणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, माजी सभापती अरविंद रावराणे, नगरसेवक डॉ. राजेंद्र पाताडे, वैभववाडी व्यापारी मंडळ अध्यक्ष रत्नाकर कदम, नगरसेवक रोहन रावराणे, नगरसेविका यामिनी वळवी, नगरसेवक प्रदीप रावराणे, नगरसेवक राजन तांबे, शासकीय ठेकेदार सुनील रावराणे, सरपंच अवधूत नारकर, प्रकाश सावंत, अंकित सावंत, विनायक रावराणे, आमकर, आशिष रावराणे व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान 3 उतरवणे हे इस्त्रोसाठी आव्हानात्मक काम होते. मात्र इस्त्रोचे शास्त्रज्ञ यात यशस्वी झाले आहेत. शास्त्रज्ञानी खूप मोठी कामगिरी केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शास्त्रज्ञ यांचे खूप खूप अभिनंदन. अशी प्रतिक्रिया संजय सावंत यांनी दिली.












