चांद्रयान – ३ हे चंद्रावर यशस्वीरित्या उतरले, कुडाळात भाजपच्यावतीने जल्लोष

चांद्रयान – ३ हे चंद्रावर यशस्वीरित्या उतरले

कुडाळात भाजपच्यावतीने जल्लोष

कुडाळ प्रतिनिधी
इस्त्रोच्या वतीने चांद्रयान – ३ हे चंद्रावर पाठवण्यात आले होते. दरम्यान हे यान आज (बुधवार) चंद्रावर यशस्वीरित्या उतरले. हे यान उतरल्यानंतर कुडाळ तालुका भाजपच्यावतीने शास्त्रज्ञांच्या कामगिरीला सलाम करून आनंदोत्सव आणि जल्लोत्सव साजरा केला.
इस्त्रोच्यावतीने चंद्रावर चांद्रयान -३ हे पाठवण्यात आले होते जगातील पहिले हे यान जे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या कक्षेत उतरविण्यात आले. आहे त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन होत आहे. कुडाळ तालुका भाजपच्या वतीने भाजप कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून नागरिकांचे तोंड गोड करण्यात आले यावेळी भाजपचे कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, प्रदेश सदस्य बंड्या सावंत, जिल्हा चिटणीस विनायक राणे, प्रदेश प्रवक्ता अविनाश पराडकर, माजी सभापती किशोर मर्गज, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, महिला मोर्चा सरचिटणीस रेखा काणेकर, नगरसेविका चांदणी कांबळी, नगरसेवक निलेश परब, चंदन कांबळी, प्रदीप माने, राम बांदेकर, मिलिंद देसाई, श्रावण शिरसाट, राजू बक्षी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो भाजपच्या वतीने कुडाळ येथे आनंद साजरा करताना भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते