धृतराष्ट्राप्रमाणे वैभव नाईकांची अवस्था!

प्रसिद्धीसाठी भुंकत राहाणे व अज्ञान पाजळणे हेच वैभव नाईकांचे एकमेव काम

दुष्काळाचे राजकारण करणाऱ्या नाईकांनी 10 वर्षातील स्वतःचे अपयशी योगदान तपासावे

दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकरी जनतेच्या मदतसाठी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात प्रशासन गतिमान असल्याने नाईक सैरभर

प्रशासन स्तरावर काही बैठकांच्या तारीख बदलल्या त्याचा बाऊ करण्याचा निंदनीय प्रकार

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची वैभव नाईकांवर सडकून टीका

मालवण | प्रतिनिधी : धृतराष्ट्राप्रमाणे वैभव नाईकांची अवस्था झाली आहे. सर्वत्र अंधार अशी स्थिती आहे. दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व जनतेच्या मदतीसाठी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात प्रशासन गतिमान असल्याने व जनता आमदार निलेश राणे यांच्या सोबत असल्याने नाईक सैरभर झालेत. प्रशासन स्तरावर काही बैठकांच्या तारीख बदलल्या त्याचा बाऊ करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून सुरु आहे. दुष्काळाचे राजकारण करणाऱ्या नाईकांनी 10 वर्षातील स्वतःचे अपयशी योगदान आधी तपासावे. प्रसिद्धीसाठी भुंकत राहाणे व अज्ञान पाजळणे हेच एकमेव काम वैभव नाईकांना उरले आहे. असा घणाघात करत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी वैभव नाईक यांच्यावर सडकून टीका केली आहे.

दत्ता सामंत म्हणाले, नाईक तुमच्या 10 वर्षे अपयशी काळात विकास ठप्प झाला. मतदारसंघ मागे गेला. समस्यांचे डोंगर निर्माण झाले. या काळात आमसभा घेणेही शक्य झाले नाही. मात्र आमदार निलेश राणे यांच्या दीड वर्षाच्याच कार्यकाळात गतिमान रित्या विकास सुरू आहे. एकाच वर्षात दोन तालुक्याच्या आमसभा त्यांनी घेतल्या. मागील दहा वर्षाच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त शेकडो कोटी निधी आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघात आणला. सर्वच ठिकाणी जनतेचा मोठा पाठिंबा आमदार निलेश राणे यांना मिळत आहे. आताही दुष्काळ स्थितीत आमदार निलेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेत आहेत. सरसकट पंचनामे गतिमान रित्या झाले पाहिजेत असे आदेश प्रशासनाला देऊन गतिमान कार्यवाही केली जात आहे. पाणीटंचाई दृष्टीने उपाययोजना सुरु आहेत. हक्काचं आमदार म्हणून आमदार निलेश राणे यांना जनतेतून मिळणारा पाठिंबा पाहून वैभव नाईक यांना पोटशूळ उठणे स्वाभाविक आहे. मात्र त्यांची सुरू असलेली फडफड ही जसा दिवा शेवटच्या वेळी फडफडतो तशीच काहीशी राजकारणात झाली आहे. समोर अंधारमय भवितव्य दिसत असल्याने केवळ भुंकत राहणे व अज्ञान प्रकट करणे हेच एकमेव काम सुरू आहे.

प्रशासन स्तरावर काही बैठकांच्या तारीख बदलल्या. काही पुढे गेल्या त्याचा बाऊ करण्याचा केविलवाणा प्रयत्न करून वैभव नाईक दुष्काळात राजकारण करत आहेत. यापुढे कायम माजी आमदार असणाऱ्या वैभव नाईक यांनी किमान अभ्यास करून व योग्य माहिती घेऊन बोलावे. म्हणजे उघडे पडण्याची वेळ येणार नाही. जिल्ह्यातील, तालुक्यातील कार्यक्रमांची नीट माहिती यापुढे तरी घ्यावी.

मालवण तालुका पाणी टंचाईची आढावा बैठक ही शनिवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी आयोजित केली आहे. काल जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन तसेच आज जिल्हा परिषदची जल व्यवस्थापन आणि वित्त विभागाची बैठक यामुळे बैठाका तारीख बदलेली. मात्र शेती पंचनामे व प्रशासन स्तरावरील प्रक्रिया सुरूच आहे. याबाबत कोणतीही माहिती नसणारे अज्ञानी वैभव नाईक केवळ टीकाटिप्पणी याच्यातच धन्यता मानून भुंकण्याचे काम करत आहेत. दुष्काळ स्थितीत सुरू असलेले त्यांचे राजकारण निंदनीय स्वरूपाचेच म्हणावे लागेल.

दुष्काळावर राजकारण करण्यापेक्षा स्वतःचे योगदान तपासावे. तसेच आमदार निलेश राणे यांच्या अभ्यासू अश्या काम करण्याच्या कार्यपद्धतीतून काही शिकता आले तर शिका. कारण आमदार निलेश राणे हे यापूर्वी आमदार नसतानाही वारंवार प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बैठका घेत होते. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर होते. मात्र तेव्हा आमदार असलेले वैभव नाईक हे काय दिवे लावत होते हे जनतेने ओळखले म्हणूनच त्यांना जनतेने घरी बसवले. आता मतदार संघातील विकास आमदार निलेश राणे यांचे कार्य स्पष्ट करणारा आहे. त्यामुळे वैभव नाईक तुम्ही भुंकण्याचे काम करत रहा. जनता सुज्ञ आहे. जनतेला आमदार निलेश राणे करत असलेले काम माहित आहे. त्यामुळे नाईक तुमच्या टीकेला जनता ही भीक घालत नाही. असा हल्लाबोल शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी करतं वैभव नाईक यांची पोलखोल केली आहे.