राजापूर (वार्ताहर): महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाच्या राजापूर आगाराच्या वतीने दिनांक ८ ते १० सप्टेंबर २०२३ या दरम्यान ‘एसटी संगे देवदर्शन’ अशा अध्यात्मिक पर्यटन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेमध्ये श्री क्षेत्र तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, सिध्देश्वर, सोलापूर कोल्हापूरची श्री महालक्ष्मी आदी प्रेक्षणीय स्थळे असणार आहेत. या यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रवाशाला १२५५ प्रतीव्यक्ती तिकीट दर आकारण्यात आला असुन बाकीचा खर्च हा त्यान्ना वैयक्तिक करायचा आहे.
ऱाजापूर आगारातुन प्रवासाला सुरवात होईल. या दर्शन यात्रेत सहभागी होवु इच्छीणाऱ्या यात्रेकरुमधील महिलांना (महिला सन्मान योजना ५० टक्के )आणि७५ वर्षावरील जेष्ठ नागरीकांसाठी (जेष्ठ नागरीक योजना १०० टक्के )त्या लाभाची सुविधा दिली जाणार आहे. ज्या भाविकांना या देवदर्शन यात्रेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी राजापूर आगार व्यवस्थापक सौ. शुभांगी पाटील, वाहतुक नियंत्रक सचिन मोरे, यांसह आगारातील अन्य अधिकारी यांच्याशी किंवा आगाराशी संपर्क करायचा आहे.












