दाखला नेण्यासाठी आलेला शिरशिंगे येथील तरुण बेपत्ता

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी पंचायत समितीत दाखला आणायला जातो, असे सांगुन घरातून निघून गेलेला तरुण शिरशिंगे-परबवाडा येथून बेपत्ता झाला आहे. विठ्ठल लवू परब (वय ४५) असे त्याचे नाव आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद त्याचे नातेवाईक सत्यवान परब यांनी दिली आहे. यात विठ्ठल याचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. तो दाखला आणण्यासाठी जातो, असे सांगून घरातून निघून गेला होता. परंतु अद्याप पर्यत परलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार सावंतवाडी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.