लांजा न. पं. प्रभाग क्र. ३ मध्ये स्वामी मठ कात भट्टी येथे बांधण्यात आला वनराई बंधारा

परिसरातील विहिरींच्या भूजल पातळीत वाढ होण्यास होणार मदत

संतोष कोत्रे
लांजा : आमदार किरण सामंत यांच्या सूचनेनुसार लांजा नगरपंचायत प्रभाग क्र. ३ मध्ये स्वामी मठ कात भट्टी या ठिकाणी नुकताच वनराई बंधारा बांधण्यात आला. या बंधार्‍यामुळे परिसरातील विहिरींच्या भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन मध्ये हा वनराई बंधारा बांधण्यात आला.
यामध्ये लांजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, लांजा डाफळेवाडी शाळा प्रभातील नागरिक उत्स्र्तपणे सहभागी झाले होते. स्थानिक नगरसेविका सौ दुर्वा प्रसाद भाईशेट्ये, सौ श्रध्दा संजय तोडकरी यांच्या संकल्पनेतून श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला या बंधाऱ्या मुळे भाईशेट्येवाडी,पांनगलेवाडी, उपशेटे वाडी,कुंभार वाडी, रोहिदास वाडी,बाजारपेठ, लिंगायत वाडी,शेटेवाडी या वाड्यातील विहिरीच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.
दरम्यान बंधारा बांधण्याचे उपक्रमाप्रसंगी लांजा नगराध्यक्षा सौ सावली कुरुप, उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर, नगरसेविका सौ दुर्वा भाईशेट्ये, सौ श्रध्दा तोडकरी, सौ निधी गुरव, सौ साक्षी मानकर, श्री सिद्धेश भुवड, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री आजगावकर, शिक्षक रविंद्र वासूरकर,सौ अंकिता कदम, श्री कोकणी, श्री सातपुते, श्री वैभव कदम, डाफळेवाडी शाळा मुख्याध्यापक मनोज रेडीज, सौ दिपाली यादव ,सौ रुक्मिणी कदम, ग्रामस्थ प्रमोद दळवी, प्रकाश भाईशेट्ये, सुभाष पानगले, योगेश डांबरे,नयन वासुरकर, संजय तोडकरी, प्रसाद भाईशेट्ये, जितेन्द्र उर्फ बाबू गांधी, दादा आचरेकर, लिंगायत काका, सौ अनुजा पांचाळ,सौ रेणू म्हापूस्कर, सौ संजिवनी पांचाळ सौ मानसी कोपरे, व सर्व हायस्कूल व डाफळेवाडी शाळा विद्यार्थी उपस्थित होते.