राजापूर प्रतिनिधी: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आणि कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी शुक्रवारी राजापुरातील प्रसिध्द असलेल्या आडिवरे येथील श्री महाकाली मंदिराला भेट दिली व श्री महाकाली देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर विश्वस्तांच्या वतीने अध्यक्ष प्रसाद शेटये यांच्या हस्ते आ. राणे यांचा सत्कार करण्यात आला.
नवरात्र उत्सवात दरवर्षी आ. राणे हे आडिवरेच्या श्री महाकाली देवीच्या दर्शनासाठी येतात, शुक्रवारी आ. राणे हे दुपारी आडिवरे येथे दाखल झाले व त्यांनी श्री महाकाली देवीचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर विश्वस्तांच्या वतीने अध्यक्ष प्रसाद शेटये यांच्या हस्ते आ. राणे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंदिर विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष सुबोध नाईक, खजिनदार मंगेश लोटलीकर उपस्थित होते. यावेळी आ. राणे यांच्यासोबत शिवसेनेचे रवींद्र नागरेकर, दीपक बेंद्रे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिक मटकर, अरवींद लांजेकर, अमर वारीशे, कशेळीचे वसंत पाटील, अमोल सकपाळ, नागेश सकपाळ, विनोद कोरगावकर, बबलु फोडकर, भूषण नवाळे, सुधीर रोकडे , नानू आडिवरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यावरील आणि कोकणावरिल दुष्काळाचे संकट दूर कसे असे साकडं आ. राणे यांनी श्री महाकालीला घातले.














