तीन मच्छीमारांसाठी देवदूत ठरलेल्या दांडीतील दोघा मच्छीमारांचा सत्कार

 

मालवण | प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वी निवती दीपगृहासमोर २५ वाव खोल समुद्रात बंद पडलेली मासेमारी नौका आणि त्यातील तिघा मच्छीमारांना सुखरूप दांडी समुद्रकिनारी सुखरुप आणणारे रामचंद्र पराडकर उर्फ बाबु तारी आणि बाबी तारी या दोघा मच्छीमारांचा मालवण पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे व अन्य अधिकारी यांनी तारी बंधुंचे कौतुक केले.शासकीय विभागांच्या गस्ती नौका सध्या कार्यरत नाहीत. त्यादिवशी समुद्रातील वातावरणही खराब होते. अशा परिस्थितीत तारी बंधु देवदुताप्रमाणे मदतीसाठी धावून आले. असे सांगत पोलीस निरीक्षक यांनी कौतुक केले.