सत्कोंडी येथे वनराई बंधारा

जाकादेवी | वार्ताहर 

तालुक्यातील सत्कोंडी येथील वळकुंडकरणी नदीवर संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त ‘स्वच्छता हीच सेवा’ ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत वनराई बंधारे बांधण्यात आले.
या उपक्रमात ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडी पदाधिकारी व कर्मचारी, उमेद अंतर्गत तिरंगा महिला ग्रामसंघातील सत्कोंडी गावातील बचतगट पदाधिकारी, जि. प. आदर्श शाळा सत्कोंडीचे शिक्षकवृंद, विद्यार्थी व मोठ्या संख्येने सत्कोंडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.‌
याआधी असेचे वनराई बंधारे सत्कोंडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मौजे कांबळेलावगण येथे ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडी व सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ बलेकर खालचीवाडी यांच्या सहयोगातून महसूल गाव कांबळेलावगण येथील ब्रम्ह्याच्या पऱ्यावर बांधण्यात आले. तसेच महसूल गाव पन्हळीतील वनराई बंधारे येत्या दोनतीन दिवसांत बांधण्यात येतील असे ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीचे सरपंच सतिश थुळ यांनी सांगितले.