मसुरे | झुंजार पेडणेकर : शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल मूळ वेंगुर्ले येथील सौ. प्रिया प्रवीण मयेकर यांना राज्यस्तरीय ‘शिक्षणरत्न पुरस्कार २०२६’डोंबिवली येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
लेखन अन् मी साहित्य कला प्रतिष्ठान’ आणि पाटील फिल्म प्रोडक्शन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पूर्व येथील वक्रतुंड सभागृह, गणेश मंदिर संस्थान येथे आयोजित राज्यस्तरीय गुणगौरव सन्मान सोहळ्यात प्रिया मयेकर यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी
या संस्थेचे संस्थापक रमेश मारुती पाटील, प्रा. डॉ. राजू श्रावस्ती तर अध्यक्षस्थानी अॅड. बाळासाहेब तोरसकर आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष रमेश पाटील म्हणाले
सौ. प्रिया प्रवीण मयेकर यांना मिळालेला ‘शिक्षणरत्न पुरस्कार’ हा त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव असून, या सन्मानामुळे त्यांना पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. प्रिया मयेकर यांनी आजपर्यंत साहित्यिक लेखणीतून समाजासाठी दिलेली शिकवण ही एक उत्कृष्ट दर्जाची होती तसेच आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत विद्यार्थी ज्ञानदान तसेच साहित्यिक सामाजिक कला शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम रीतीने योगदान दिल्याबद्दल त्यांची निवड संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. प्रिया मयेकर या सिंधुदुर्ग रहिवासी संघटना महिला माजी सचिव तसेच भंडारी उत्कर्ष मंडळ उल्हासनगर माजी अध्यक्ष, सहली जॉईन ग्रुप च्या सदस्य म्हणून कार्यरत असताना समाजाभिमुख विविध उपक्रम राबविले होते. मुंबई खादी ग्रामोद्योग मध्ये काम करताना महिलांसाठी विशेष उपक्रम राबवून सहकार्य केले होते. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक सेवा, साहित्य लेखन आणि विविध प्रश्नांबाबत आवाज उठवण्याचा काम त्या करत आहेत. प्रिया मयेकर यांना आतापर्यंत विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून त्यांच्या अनेक कथा काव्य प्रसिद्ध झालेले आहेत. सिंधुदुर्गातील मुंबईतील महिलांसाठी त्यांनी आजवर अनेक उपक्रम राबवून महिला सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शिक्षण रत्न राज्यस्तरीय पुरस्कार विविध मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला.. यावेळी बोलताना प्रिया मयेकर म्हणाल्यात आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळालेत परंतु या संस्थेच्या वतीने मिळालेला हा राज्यस्तरीय पुरस्कार मला नेहमीच प्रेरणा देत राहील. यापुढे सुद्धा साहित्य कला क्रीडा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त योगदान देऊन समाजप्रती कार्य करेन.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली फडके आणि संतोष जाधव यांनी केले. मान्यवरांची मनोगते, पुरस्कार वितरण आणि बालप्रतिभेच्या सादरीकरणामुळे सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.













