मसुरे | झुंजार पेडणेकर : खोणी पलावा सार्वजनिक नवरात्रोत्सवात श्री. अनिल नारकरबुवा व राज्यातील ग्रामीण शाळांमधून क्रीडा संस्कृतीचे प्रसार करणारे भजनसेवक दाभोलीचे अशोक दाभोलकर मेस्त्री ह्यांचा सांस्कृतिक मंडळ पलावा अध्यक्ष श्री. सुरेशदादा ठाकरे यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
पलावासारख्या शहरात मराठी संस्कृती व मायबोली मराठीचे जतन व्हावे म्हणून गेली दोन वर्ष मराठी भजनांच्या माध्यमातून पलावा शहरात श्री. अनिल नारकर बुवा व सर्वश्री केशवराव लांडगे, देवेंद्र कदम, किशोर तेरसे, अरुण राघवन, मोहन पाचपुते, संतोष मांजरेकर आदीनी पलावातील मराठी बंधू भगिनीना एकत्र आणत भजनाची गोडी लावली व मराठी भाषा व भजन संस्कृती जिवंत ठेवल्याबद्दल आम्ही पलावा फेज ०२ मराठी समूह व भजन कट्टा समूहातील सर्व पुरुष व महिला सदस्यांचे विशेष कौतुक करीत असल्याचा उल्लेख आयोजन कमिटीचे अध्यक्ष श्री. सुरेशदादा ठाकरे यानी आपल्या भाषणात केला. सन्माना बद्दल दाभोलकर यवणी आभार मानले.













