कणकवली कॉलेजच्या वतीने रुपये ५ लाख विमा संरक्षण रकमेचा धनादेश मनोहर जाधव यांचेकडे सुपूर्त

कणकवली : कणकवली कॉलेज कणकवली येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कुमार उत्कर्ष मनोहर जाधव याचे दिनांक २४/०४/२०२५ रोजी अपघाती दुःखद निधन झाले. कणकवली कॉलेज, कणकवली येथे शिक्षण घेत असल्यामुळे महाविद्यालयाने ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनीकडे विमा संरक्षण पॉलिसी घेतली होती. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला आहे. मंजूर विमा रकमेचा धनादेश उत्कर्षच्या आई – वडिलांकडे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, अधीक्षक संजय ठाकूर, संजय राणे, भूषण राणे व विद्यार्थ्यांचे वडील मनोहर जाधव व आई मोहिनी जाधव इत्यादी उपस्थित होते.