चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील परकार कॉम्प्लेक्ससमोर मालवाहू ट्रकने विद्युतवाहिनी ओढत नेल्याची घटना घडली. या प्रकारात विद्युतवाहिनीचा ताण वाढल्याने वीजेचा खांब वाकला. सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना टळली.
या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक किशोर रेडीज यांच्यासह परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणचे कर्मचारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. विद्युतवाहिनी आणि वाकलेल्या खांबामुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मालवाहू वाहनांमुळे शहरातील विद्युतवाहिन्यांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेने आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.












