खेड(प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गा वरील भोस्ते घाटात असलेल्या बीएसएनएल टॉवर च्या खोलीतून सुमारे ४१ हजार रुपये किमतीचे जनरेटर व अन्य साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी उघडकीस आली या प्रकरणी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
भोस्ते घाटाजवळील हिल टॉप टॉवर येथील बीएसएनएल टॉवरच्या बंद स्थीतीत असलेले १५ के. व्ही ए कॅपॅसीटीचे ग्रीव्हज कंपनीचे जनरेटर मोकळ्या जागेतुन व रुम मधील १.५ टन कॅपॅसीटीचे २ स्प्लीट एअर कंडिशनर कोणीतरी अज्ञात इसमाने बी.एस.एन.एल टॉवरच्या पहिल्या रूमच्या डाव्या साईडचे खिडकिची काच फोडून आणि लोंखडी ग्रील तोडून आत मध्ये प्रवेश करत चोरून नेले या प्रकरणी संजय पांडुरंग तिडके रा खेड यांनी तक्रार दाखल केली आहे
चोरी मध्ये ३५ हजार ,६० रू. किंमतीच्या १५ के. व्ही.ए कॅपॅसीटीचे ग्रीव्हज कंपनीचा जनरेटर , ६ हजार रु. किमतीचे १.५ टन कॅपॅसीटीचे २ स्प्लीट एअर कंडिशनर असा मुद्दे माल चोरून नेला या प्रकरणी अज्ञात चोरट्या वर भा द वि क ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे









