शिवसेनेचा उबाठा गटाला ओणी विभागात दणका

शेकडो कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाने पुन्हा एकदा उबाठा गटाला जोरदार दणका दिला आहे. ओणी विभागातील शिवसेनेचे युवा पदाधिकारी मनिष लिंगायत यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री नाम. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थीतीत या सर्व उबाठा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.राजापूर तालुक्यात उबाठा गटाला गळती लागली आहे. यापुर्वी अणसुरे, वाल्ये, तळगाव या भागातील अनेक उबाठा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आता ओणी विभागात उबाठा गटाला खिंडार पडले आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मार्गदर्शक आर. डी. सामंत, राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत, युवा नेते किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख अशफाक हाजू यांच्या नेतृत्वाखाली या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व प्रवेशकर्त्यांनी शिवसेनेते प्रवेश केला. यावेळी ना. सामंत यांनी या प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. भविष्यात राजापूर तालुक्याच्या आणि ओणी विभागाच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी ना. सामंत यांनी प्रवेशकर्त्यांनि दिली.
ओणी जिल्हा परिषद गटातुन शिवसेनेते प्रवेशकर्त्यांमध्ये मनिष लिंगायत,शंकर लिंगायत,मंगेश लिंगायत,प्रविण लिंगायत,दीपक लिंगायत,नंदकिशोर लिंगायत,निळू लिंगायत,नितिन माळी,अनिल गुरव,अवधूत गुरव, भूषण चौगुले मनोहर जैतापक,रबंटी माळी,निलेश माळी,मनोहर माळी,नारायण माळी,विठ्ठल शेलार,चंद्रकांत लिंगायत,अनिकेत लिंगायत,नितेश लिंगायत,संतोष,गुरव,दीपक गुरव,आशिक लिंगायत आदींसह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.