केळूस कालवी येथे श्री शेतकरी गट कालवी या गटातर्फे “वसुबारस” हा सामुहिक कार्यक्रम संपन्न..

लोकप्रतिनिधी, शेतकरी, ग्रामस्थ आणि अधिकारी यांचा होता सहभाग

वेंगुर्ले : प्रतिनिधी 

वेंगुर्ले तालुक्यात श्री शेतकरी गट कालवी या गटातर्फे जि. प. पू. प्रा. केळूस कालवी या ठिकाणी लोकप्रतिनिधी, शेतकरी, ग्रामस्थ आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत वसुबारस हा सामुहिक कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गाईचे पूजन करून गो मातेचे महत्व विशद करण्यात आले. तसेच गो धन बाबत जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमाला वेंगुर्ला पं. समिती उपसभापती सचिन देसाई, सदस्य आपी फणसेकर, जि.प. सदस्या सौ. यज्ञा साळगावकर, केळुस ग्रामपंचायत सरपंच योगेश शेट्ये, सदस्य महेश नागवेकर, लक्ष्मण वराडकर, मानसी कुडव, सहाय्यक कृषी अधिकारी जिवन परब, पं. समिती पशुधन विभाग अधिकारी डॉ. म्हापणकर, पशुवैद्यकिय विभाग कोचरा डॉ. उमेश पेंडुरकर, कालवी पो.पा.सौ. मृणाली राऊळ, कालवी अंगणवाडी सेविका किरण रेवणकर, आशा ताई सौ. सुचिता केळूसकर आणि तळी बोवला कालवीचे शेतकरी, ग्रामस्थ, श्री शेतकरी गटाचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी पशुधन विभागामार्फत शेतकच्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी मका बियाण्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी कृषी सहाय्यक जीवन परब यांनी गायीचे महत्व सांगून गाय आपल्याला काय काय फायदे करून देते याची माहिती दिली. यावेळी जि.प. सदस्या सौ. यज्ञा साळगावकर यांनी उपस्थित सर्वांचे गायवासरू प्रतिमा देऊन सर्व उपस्थितांना सन्मानित केले.