रत्नागिरी :
भारतीय जनता पार्टी नाचणे विभागीय कार्यालय कूवरबावं येथे दिनांक २७/०८/२०२३ रोजी मोफत आभा कार्ड नोंदणी व नवीन मतदार नोंदणी शिबिर सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत राबवण्यात आले .
सदर कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष भाजपा दक्षिण राजेश सावंत आणि माजी आमदार सुरेन्द्र तथा बाळासाहेब माने यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.सदर कार्यक्रम यशस्वी होणे करीता सतेज नलावडे, नितीश अपकरे , रसिक कदम , धनंजय जोशी व दीपक आपटे यांनी मेहनत घेतली.सदर कार्यक्रम ग्रामस्थांच्या मागणीवरून परत घेण्यात आला यामध्ये कुवारबाव नाचणे पोमेंडी खेडशी मिरजोळे व अन्य आसपासच्या गावातील लोकांनी लाभ घेतला व अशा पद्धतीची आपल्या देशाच्या लाडक्या पंतप्रधानांच्या विविध कल्याणकारी योजना समाजापर्यंत पोचवण्याकरता समाजउपयोगी शिबिरे घेत जा असे ही सांगितले
सदर शिबिरात यावेळी जवळपास १८५ ते १९० लोकांनी आभा कार्ड नोंदणी केली तर जवळपास ९२ नवीन मतदार नोंदणी करण्यात आली.












