दिवाळीत भरलेल्या माखजन च्या आठवडा बाजारात ग्राहकांची गर्दी

गौरव पोंक्षे माखजन : 
संगमेश्वर तालुक्यातील ऐन दिवाळी मध्ये भरलेल्या माखजन च्या आठवडा बाजारात आज शनिवारी गर्दी पाहायला मिळाली. मागचे काही आठवडा बाजार भात कापणी व अन्य शेती कामात शेतकरी गुंतल्याने,गजबजलेले पाहायला मिळाले नाहीत.पण दिवाळी ची खरेदी आणि नियमित भाजी पाला घेण्यासाठी या आठवडा बाजारात नागरिक मोठ्या संख्येने आलेले पाहायला मिळाले.फटाके व भाऊबीजेसाठी भेटवस्तू घेण्यासाठी,तसेच विद्युत रोषणाई चे साहित्य मिळणाऱ्या दुकानात गर्दी पाहायला मिळाली.मसाले,भाजीपाला,मासळी,आदी दुकाने ही फुलली होती.
माखजन येथे दर शनिवारी आठवडा बाजार भरतो.आजूबाजूच्या आंबव पोंक्षे,कासे,कळंबुशी,असावे नारडुवे,पेढांबे,बुरंबाड,करजुवे,धामापूर,सरंद,कोंडीवरे अशा सुमारे १५ गावातून ग्राहक माखजन बाजारपेठेत येतात.त्यामुळे अनेक वर्षांपासून माखजन च्या शनिवारच्या आठवडा बाजाराला विशेष महत्व आहे.यावेळी बाजारात ग्राहकांची संख्या वाढल्याने विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.