सावंतवाडी । प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या पत्रकानुसार १५ नोव्हेंबर रोजी होणारी कोकण व नाशिक विभागातील महसूल सेवक (कोतवाल) पदाची लेखी परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे.
शासनाने दि. १२ नोव्हेंबर २०२६ निर्णय घेण्यात आला आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने, तसेच वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबतचा शासन निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नवीन वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल:
नवीन जाहिरात: १६ ते ३१ डिसेंबर २०२६
लेखी परीक्षा: १७ जानेवारी २०२७
निकाल: १८ जानेवारी २०२७
या बदलाची सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.













