लांजा (प्रतिनिधी) : विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेने केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून कामाला सुरुवात केल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रत्नागिरी येथे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधकांची भेट घेऊन आभार मानते.
विलवडे रेल्वे स्टेशनवर अधिकाधिक गाड्या थांबवाव्यात त्याकरीता दुसऱ्या फलाटाची उभारणी करावी याचबरोबर प्रतिक्षालय,दिव्यांगासाठी रॅम्प बांधावा अशा मागण्या घेऊन विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेने २० सप्टेंबर २०२६ रोजी लाक्षणिक उपोषण केले. या रेल्वे स्टेशनवर अवलंबून असलेल्या ७२ गावातील प्रवाशांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन शांततेत हे उपोषण पार पडले.त्या वेळेला प्रशासनाकडून या सर्व मागण्या मान्य करून पुढील पंधरा दिवसांत आम्ही त्याबाबतचे पत्र देऊ असे सांगितल्याने सदर उपोषण स्थगित करण्यात आले होते.
प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे पुढील पंधरा दिवसांत सकारात्मक पत्र आलेच पण प्रत्यक्ष क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांनी प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून काही कामांना आम्ही सुरुवात करीत आहोत याची माहिती दिली.त्यामध्ये दिव्यांगा व वृद्ध प्रवाशांसाठी रॅम्प बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रवाशांच्या योग्य मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी येथे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधकांची भेट देऊन त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच उर्वरित कामांचा सुद्धा लवकरच पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रवासी संघटनेच्या मागण्या योग्य असून प्रतिक्षालय व दुसरे फलाट या करीता आवश्यक त्या रकमेची तरतूद करण्याविषयी संघटनेने प्रयत्न केले असून एप्रिल मध्ये आपल्याला समाधानकारक बातमी मिळेल असेही त्यांनी आश्वासन दिले.
या भेटी प्रसंगी प्रवासी संघटनेचे सल्लागार सुभाष लाड, मुंबई कार्याध्यक्ष रमेश काटकर, स्थानिक सरचिटणीस दीपक तोरसकर, तसेच सुरेश शिगम, शशिकांत खामकर, प्रकाश तोरसकर व विजय काटकर उपस्थित होते.
Home महत्वाच्या बातम्या विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली रत्नागिरी येथे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधकांची भेट













