सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त सावंतवाडी शहरात आलेल्या पालकमंत्री नितेश राणे यांनी कार्यक्रम स्थळाच्या बाजूला पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी उभ्या असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना भेट देत त्यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधला. या भेटीमुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खुलून गेला.
पंचायत समितीच्या इमारतीचे भूमिपूजन आटोपून माघारी फिरत असताना पालकमंत्री नितेश राणे यांना काही शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी बाजूला उभे राहून आपली वाट बघत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्यांना जवळ बोलून त्यांच्याशी संवाद साधला. ती मुलं कोणत्या शाळेत जातात कोणता क्लास करतात तसेच भविष्यात त्यांना काय बनायचं आहे असे अनेक प्रश्न विचारून त्यांनी मुलांना बोलतं केलं व त्यांच्याशी मन मुराद गप्पा केल्या. यावेळी त्या मुलांनीही पालकमंत्र्यांसमवेत दिलखुलास संवाद साधला. याप्रसंगी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, प्रतीक बांदेकर, सुधीर आडीवरेकर अधिक उपस्थित होते.













