राजापूर (प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्या यावर थेट चर्चा होण्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी तालुक्याची आमसभा गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. शहरातील गुजराळी येथील श्री मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा होणार आहे.
आ. किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही आमसभा असून .यापूर्वी १२ एप्रिल २०१८ रोजी अखेरची आमसभा पार पडली होती. त्यानंतर तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर राजापूर पंचायत समितीची आमसभा पार पडत आहे. त्यामुळे या आमसभेडके तालुका वासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
मधल्या काळात रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी राजापूर मध्ये जनता दरबार आयोजित करून तालुक्यातील समस्या जाणून घेतल्या होत्या. आता आमसभा गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर होणार होणार असल्याने तालुक्यातील सर्वसामान्यांना आपले प्रश्न या आमसभेत मांडता येणार आहे.
गतसप्ताहातच आ. सामंत यांनी आमसभेच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकिय विभागांची बैठक घेऊन आमसभेत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कशा प्रकारे सोडविले जातील व प्रशासनाने काय तयारी केली याचा आढावा घेतलेला आहे.
या आमसभेला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन गटविकास अधिकारी रोहित कुंभार यांनी केले आहे.
Home महत्वाच्या बातम्या आ. किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी २६ नोव्हेंबर रोजी राजापूरची आमसभा













