“कांचन डिजिटल”तर्फे “घरगुती गणपती सजावट स्पर्धा” जाहीर

 

 अल्पावधीतच रत्नागिरीत प्रसिद्धीस आलेली भव्य स्पर्धा

स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष

 गणेशभक्तांनी आजच नावनोंदणी करण्याचे आवाहन

रत्नागिरी -: रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटो स्टुडिओ “कांचन डिजिटल”तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही “घरगुती गणपती सजावट स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. अल्पावधीतच ही स्पर्धा रत्नागिरीत प्रसिद्धीस आली आणि गणेशभक्तांचा भरभरून प्रतिसाद या स्पर्धेला मिळतो. यंदाही गणेशोत्सव जवळ आला असल्याने गणेशभक्तांतून आम्हाला स्पर्धेबाबत विचारणा होऊ लागल्याचे आयोजक, प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांनी सांगितले. यंदा स्पर्धेचे चौथे वर्ष आहे.

 

कोंकणातील रत्नागिरीत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपतीमूर्ती आकर्षक, कौशल्य, नाविन्यपूर्ण बनविण्याकडे गणेशभक्तांचा कल असतोच, त्याचबरोबर देखणी आरास, मखर साकारणे, तसेच समाज प्रबोधन करणारे, धार्मिक, पौराणिक, सामाजिक देखावे करण्याचीही मोठी परंपरा आहे. गणेशभक्तांतील या कौशल्याला चालना देण्यासाठी ही स्पर्धा भरविण्यात येत असल्याचे कांचन डिजिटलचे छायाचित्रकार कांचन मालगुंडकर यांनी यानिमित्ताने सांगितले.

 

ही स्पर्धा रत्नागिरी *तालुका* मर्यादित आहे. यंदा प्रथम पारितोषिक *12000* /- हजार रुपये व ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक *8000* /- रुपये हजार व ट्रॉफी, तृतीय पारितोषिक *5000* /- हजार व ट्रॉफी, याचबरोबर विशेष उल्लेखनीय व उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.

 

ही स्पर्धा पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे. त्यासाठी आपली प्रवेशिका आजच आमच्या व्हॉट्सऍप नंबरवर ( *9422576736* ) पाठवा. यामध्ये “पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर आणि सजावटीचा विषय” अशी संपूर्ण माहिती पाठवावी. अधिक माहितीसाठी *8999332757* ह्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन कांचन डिजिटलतर्फे करण्यात आले आहे.

 

विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात सन्मानित केले जाणार आहे. *प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर राहील, याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.* तरी रत्नागिरीकरांनी बहुसंख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन “कांचन डिजिटल”चे कांचन मालगुंडकर यांनी केले आहे.