रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील वरवडे येथील वृध्दाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार 17 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 ते 7.10 वा.कालावधीत घडली आहे.
सुर्यकांत सखाराम राणे (85,रा.तिवरी बंदर वरवडे,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे. सुर्यकांत राणे हे आपल्या घ्ारी एकटेच रहात होते. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी अज्ञात कारणातून घराच्या पडवीच्या छताच्या लोखंडी चॅनलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे दाखल केले तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सुर्यकांत राणे यांना तपासून मृत घोषित केले आहे. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











