…अखेर करजुवे मुंबई १ मे पासून सुरु होणार !

प्रहार डिजिटल इफेक्ट

गौरव पोंक्षे | माखजन
संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावातून मुंबई सेंट्रल येथे जाणारी रातराणी बससेवा १ मे पासून सुरु होत आहे.ही बस तात्काळ सुरु व्हावी अशी मागणी प्रवासी वर्गातून सतत केळी जात होती.ह्या बाबतचे वृत्त प्रहार डिजिटल ने प्रसिद्ध केले होते.ही बस माखजन ,करजुवे पंचक्रोशी साठी कशी महत्वाची आहे बातमी च्या माध्यमातून मांडले होते.

या बातमीची तात्काळ दखल घेत विभागीय देवरुख आगाराने १ मे पासून करजुवे मुंबई ही बससेवा नियमित सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.ही बस ८ वा.करजुवे येथून सुटेल तर माखजन बस स्थानकातून पावणे नऊ वाजता मुंबई कडे मार्गस्थ होणार आहे.चिपळूण,महाड,माणगाव,रामवाडी अशी स्थानकांवर थांबत पहाटे ५ वाजेपर्यत मुंबई सेंट्रलं येथे पोहचणार आहे.ही बससेवा गेली ४० वर्षे या मार्गांवरून धावत होती.पण भारमान नसल्याचे कारण पुढे करत ,ही फेरी बंद करण्यात आली.
अलीकडील एसटी बस मधील नवनवीन सुधारणा व सोयीसुविधा,आरामदायी प्रवास,व महिलांना अर्ध तिकीट असल्याने,या गाडीच्या सीट्स व पर्यायाने भारमान वाढेल असा विश्वास व्यक्त होत आहे.ही बसफेरी सुरु व्हावी यासाठी प्रहार डिजिटल ने वृत्त प्रसिद्ध केल्याने, प्रहार डिजिटल चे आभार मानण्यात येत आहेत.