दापोली | प्रतिनिधी : 30 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणार्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्यू.कॉलेज चिखलगांव येथील इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यानी पर्यावरण पूरक राख्या व भेटकार्ड तयार केली आहेत. श्रावण महिन्यातील विविध सणांच्या निमित्ताने शाळेत विविध उपक्रम घेतले जातात. या वर्षी रक्षाबंधनाला मुलांनी विविध झाडांची पाने तसेच अनेक रान फुले वापरून राख्या व भेटकार्ड शाळेमध्ये तयार केली आहेत. श्रावणामध्ये निसर्गात विविध पाने फुले आलेली असतात,यांचा वापर करून मुलांनी सुंदर पर्यावरण पूरक गोष्टी बनवल्या, यामध्ये मुलांनी विविध आकाराची पाने, फुले, फांद्या, गवताचे अनेक प्रकार याचे संकलन करून त्याचा वापर केला. त्यामुळे मुलांच्या सृजनतेला वाव मिळाला, तसेच अमूर्त गोष्टीतून मूर्त आणि सुंदर गोष्टीची निर्मिती करण्याचा आनंदही घेतला. स्वतः बनवलेली भेट कार्ड दुसऱ्याला देतानाचा आनंद काही वेगळाच असणार आहे हेही त्यातून त्यांना लक्षात आले.लीफ आर्ट या एका आगळावेगळया कला प्रकाराची मुलांना ओळख झाली.











