देवरुख आगराच्या कर्मचाऱ्यांनी साजरे केले माखजन येथे रक्षाबंधन

माखजन | वार्ताहर :     संगमेश्वर तालुक्यातील देवरुख आगराच्या चालक वाहकांनी माखजन बसस्थनकात रक्षाबंधन केले.एस टी बस ला राखी बांधून चालकांनी, एसटी प्रती असलेले प्रेम व्यक्त केले.शिवाय कर्मचाऱ्यांनी एकमेकाला राखी बांधली यावेळी वाहतूक नियंत्रक अविनाश जाधव,विकास पवार,विजय कोंडविलकर, ललित पोटफोडे,राहुल सरकटे,एस जी भोळे उपस्थित होते.