शिरगाव (वार्ताहर) माध्यमिक विद्यामंदिर साळशी याप्रशालेतील सुजल प्रभाकर साळसकर याने ओरस येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलगे मध्ये ८१ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची कोल्हापूर येथे विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे
तसेच देवगड तालुकास्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींमध्ये लहान गटात कॅरम प्रकारात हिमानी चंद्रकांत घाडी हि विजयी झाली असून तिची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे
या दोन्ही विद्यार्थ्यांना याप्रशालेतील सहाय्यक शिक्षक पुरुषोत्तम साटम,संजय मराठे, प्रशिक्षक तुषार चव्हाण,मुख्याध्यापक माणिक वंजारे यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल संस्था पदाधिकारी,स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान सावंत व सर्व सदस्य, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वर्ग , शिक्षकेतर कर्मचारी ,पालक ,ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत











