

केळवलीत दोन ग्रामपंचाय सदस्यांसह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल
तालुका प्रमुख अशफाक हाजूंचा करिष्मा
राजापूर l प्रतिनिधी : तालुक्यात उ. बा. ठाकरे गटाला दिवसेंदिवस धक्क्यावर धक्के बसत आहेत. विकासाची पोकळ आश्वासने, न होणारी कामे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची होणारी अवहेलना याला कंटाळून अनेकजण पक्ष त्याग करत आहेत. यापुर्वी अणसुरे, नाटे, वाल्ये, ओणी, राजापूर शहर या भागातील उबाठाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. शुक्रवारी केळवली विभागातील केळवली गावातील शेंगाळेवाडी, मस्तेकरवाडी, करमरकरवाडी, सिध्दार्थवाडी व गौळवाडीतील शेकडो कार्यकर्त्यांनी उबाठा गटाला रामराम करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
जिल्हयातील समस्त शिवसैनिकांचे मार्गदर्शक आर. डी. उर्फ आण्णा सामंत यांच्या प्रमुख उपस्थित या सर्व प्रवेशकर्त्यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. यामध्ये प्रबोध तांबे व दिक्षा तांबे या दोन ग्रामपंचायत सदस्यांचाही समावेश आहे. तशी माहीती तालुका प्रमुख अशफाक हाजू यांनी पत्रकारांना दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रभावीत होत व राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी जिल्हयात विकास कामांचा लावलेला धडाका यावर प्रभावीत होत गावच्या विकासासाठी आंम्ही सर्वजण मुळ शिवसेनेत दाखल होत असल्याचे या प्रवेशकर्त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आण्णा सामंत, जिल्हाध्यक्ष राहुल पंडीत, युवा नेते किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व राजापूर तालुका प्रमुख अशफाक हाजू यांच्या नेतृत्वाखाली या सर्व प्रवेशकर्त्यांनी प्रवेश केला.
या प्रवेशकर्त्यांमध्ये प्रबोध तांबे व दिक्षा तांबे या दोन ग्रामपंचायत सदस्यांसह प्रणय जाधव, एकनाथ शेंगाळे, गणपत शेंगाळे, गोपाळ शेंगाळे, दिपक शेंगाळे, सत्यवार शेंगाळे, सहदेव कांबळे, मधुकर शेंगाळे, संजय लोटणकर, सुधीर केळवलकर, अमोल केळवलकर, अभिषेक सप्रे, सुनिल लोटणकर, राजेश करंबेळकर, दामोदर शेंगाळे,राघोबा मस्तेकर, मधुकर सप्रे, नितीन पवार, शशिकांत पवार आदींसह शेकडो महीला व पुरूष कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या प्रवेश कार्यक्रम प्रसंगी आण्णा सामंत, अशफाक हाजू यांसह महिला आघाडीच्या प्रमुख शुभांगी डबरे, संघटक भरत लाड, उपतालुका प्रमुख नाना कोरगावकर, विभाग प्रमुख बाळकृष्ण तानावडे, सरपंच अमोल लाड उपविभाग प्रमुख अजित घाणेकर माजी उपसभापती सौ. भाग्यश्री लाड आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व प्रवेशकर्त्यांचा पक्षात योग्य तो सन्मान केला जाईल व केळवली गावच्या विकासासाठी ना. सामंत यांच्या मार्फत आवश्यक तो विकास निधी दिला जाईल अशी ग्वाही अशफाक हाजू यांनी दिली.












