मंडणगड | प्रतिनिधी : जावळे ग्रामपंचायत तंटामुक्ती ग्राम समितीचे अध्यक्षपदी कुणबी क्रीडा असोसिएशनचे क्रीडा प्रमुख अनंत शंकर रटाटे यांची नुकतीच एक मताने निवड करण्यात आली. २२ आगस्ट 2023 रोजी झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली यावेळी सरपंच श्री महेंद्र रटाटे, ग्रामपंचायत सदस्या सौ.राजेश्री रटाटे, सौ. सुरक्षा रटाटे, सौ. समृद्धी चोरगे, पोलीस पाटील संतोष रटाटे व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्वच ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.










