लांजा (प्रतिनिधी )तालुक्यातील भांबेड येथील नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड (पेठदेव)यांच्यामार्फत गणेशोत्सव काळात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवा निमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व व स्वराज्याचे शिलेदार कथा-कथन स्पर्धां दि.२६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्राथमिक गट- १ ली ते ७ वी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे प्रजातंत्र,किल्ले रायगड, शिवराज्याभिषेक एक सोनेरी सोहळा, जाणता राजा: छत्रपती शिवाजी महाराज आदी विषय ठेवण्यात आले आहेत. पारितोषिक प्रथम १५५५ चषक व प्रमाणपत्र,द्वितीय ११११ चषक व प्रमाणपत्र,तृतीय ७७७ चषक व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ (2) चषक व प्रमाणपत्र तसेच माध्यमिक गट – ८ वी १० वी स्वराज्याचे शिलेदार कथा-कथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पारितोषिक प्रथम २१११ चषक व प्रमाणपत्र,द्वितीय १५५५ चषक व प्रमाणपत्र,तृतीय ११११ चषक व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ (2)चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत.
तालुक्यातील इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे दि. १५ सप्टेंबर पर्यंत मंडळाने चिटणीस ऋषिकेश बेर्डे ९३७३५०५७७३, कार्यक्रम समिती अध्यक्ष प्रकाश जोशी ९४२२९९९१४४ यांकडे व्हॉट्स ॲपवर क्रमांकावर नोंदवावीत. स्पर्धकांना महत्वाची सूचना माध्यमिक गटातील कथा-कथन वेळ ५+२ मिनिटे व प्राथमिक गटातील वेळ ३+१ मिनिटे राहील. माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांची कथा स्वराज्याचे शिलेदार या विषयावर असावी. जर एकच कथा दोन स्पर्धकांनी घेतल्यास कथा बदलून दिली जाईल. यासाठी लवकरात लवकर आपण निवडलेल्या कथेचे नाव संपर्क करुन कळवावे. स्पर्धेला येताना स्पर्धकाचे नाव आणि इयत्ता यानुसार शाळेतील मुख्याध्यापकांचे सही व शिक्या नुसार पत्र आणावे.










