दोडामार्ग मध्ये वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद
ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते उद्घाटन
दोडामार्ग प्रतिनीधी
तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग मोठया प्रमाणात शालेय मुलीनी घेतला यांचे कौतुक वाटले कारण पुढील वर्षभर अनेक स्पर्धा होणार आहे यामध्ये प्रामुख्याने सर्वांनी सहभाग घेउन आज अनेक जणांना बक्षिस मिळाले नाही त्यांनी नाराज न होता प्रयत्न केले पाहिजेत कायम सकाळी लवकर उठून धावण्याची सवय लावली पाहिजे तरच भविष्यात आपण अनेक स्पर्धेत सहभाग घेउन विजेते ठरणार आहात असे प्रतिपादन ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले
दोडामार्ग तालुका शिवसेनेचे वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धा शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी व्यासपीठावर तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस शिवसेना विधानसभा अध्यक्ष प्रेमानंद देसाई उपजिल्हाप्रमुख राजेद्र निंबाळकर शैलेश दळवी तुकाराम बर्डे स्वातंत्र्य सैनिक सूर्यकांत परमेकर युवा सेना प्रमुख भगवान गवस महिला प्रमुख गडेकर जिल्हा उप प्रमुख मनीषा गवस माजी सभापती दयानंद धाऊसकर, उप तालुका प्रमुख दादा देसाई सूर्यकांत गवस कुडासे सरपंच देसाई कोनाळ संरपच गवस उपसरपच रत्नकात कर्पे शहर प्रमुख योगेश महाले माजी सरपंच ज्ञानेश्वर शेट्ये हर्षद सावंत जिल्हा संघटक गोपाळ गवस आदीं उपस्थित होते यावेळी शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्पर्धेत सहभाग व यशस्वी विद्यार्थी यांना वाढदिवसाच्या निमित्ताने वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक व अन्य क्रमांक प्राप्त विद्यार्थी यांना अनेक मान्यवरांनी सन्मानित केले यावेळी गणेशप्रसाद गवस, राजेद्र निंबाळकर प्रेमानंद देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन शैलेश नाईक यांनी केले या स्पर्धेत तालुक्यातील सर्व शाळा व शिक्षक यांचे वतीने अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते सर्व खेळाडू शिक्षक यांना टीशर्ट प्रदान करण्यात आली त्यांनतर ग्राऊंडवर सर्व व्यवस्था करण्यात आली होती यामध्ये आरोग्य पथक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळे स्पर्धा दोडामार्ग ते आयी रस्त्यावर घेण्यात आली प्राथमिक शाळा मैदानावर आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन व समारोप सोहळा संपन्न झाला यावेळी तालुक्यातील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी संरपच आदी उपस्थित होते
फोटो
दोडामार्ग तालुका स्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला त्याच्या सन्मान करतांना ब्रिगेडियर सुधीर सावंत प्रेमानंद देसाई राजेद्र निंबाळकर गणेश प्रसाद गवस सूर्यकांत परमेकर योगेश महाले शैलेश दळवी गोपाळ गवस आदीं मान्यवर उपस्थित होते
Home ताज्या घडामोडी दोडामार्ग मध्ये वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते...










